Thursday 18 March 2021

संधिप्रकाश

 # # # # #


संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते

तेव्हा अणकुचीदार होत जातात 

अवैध भावनांचे कोपरे

पूर्वेकडच्या अंधारात 

बीभत्स

संधिप्रकाश

पश्चिमेकडच्या आभाळात

स्तंभित अहर्निशेच्या सीमारेषेवर 

आणि कातरवेळी अभिमुख होतो

स्वतःपासून स्वतःपर्यंतचा अव्याहत चालणारा प्रवास 

- पुष्कर

(१९ मार्च २०२१)


जर्मनी ट्रिप १ : ड्रेसडेन आणि फ्रायबर्ग

# # # # # २८ सप्टेंबर २०२३ गोपाल ची इंटर्नशिप जर्मनी मध्ये फिक्स झाल्यापासून जर्मनी ला त्याच्याकडे फिरायला जायचं हे ठरवून झालं होतं. मुळात क...