Saturday, 21 April 2012

आफ्टर सबमिशन्स...

     दुपारी झोपेतून उठल्यावर कित्येक शतकानंतर झोपेतून उठल्यासारखं वाटलं. इतक्या दिवसांच्या सबमिशन च्या धावपळीचा कडता निघाला. 'सब ' मिशन' या शब्दाचा पुरेपूर अर्थ कळाला. सब- मिशन हे एक छोटंसं मिशनच असतं.प्रत्येकजण जेम्स बॉण्ड सारखा झपाटून कामाला लागलेला असतो. सरकारी ऑफिस मध्ये होत नसेल एवढी फाईलींचीची देवाण घेवाण या काळात इंजिनीरिंग कॉलेज मध्ये होते. एकदा का "साहेबांची" सही झाली की काम फत्ते! 

     पण यावेळीचे सबमिशन्स खरंच अंगावर आले. सहा सब्जेक्ट्स! सहा फाईली ! राईटप्स, शीट्स ... काय काय नि काय काय!
शीटची तर मजाच वेगळी . शेवटी हर्षलकडून 'घेतलेली' शीट फक्त एडीट करून सरांना 'दाखवून' प्रिंट करणं एवढंच काय ते काम. 
पण ऐनवेळी कॅड lab मधले पी सी ढिम्म! ऑटोकॅड ओपेन होता होईना. कुठल्या देवाला कौल लावावा 
म्हणजे ऑटोकॅड ओपन होईल या चिंतेत आम्ही असताना अचानक शेजारच्या पी सी वर ऑटोकॅड सुरु झालं. देव पावला. धवल, मी आणि अभिषेक हरहर महादेव म्हणत शीटच्या एडिशन वर लागलो.
शीट एडीट झालं. आता सरांना नेऊन दाखवायचं  म्हणजे एक laptop लागणार होता. शशांक च्या laptop ला पाचारण करण्यात आलं. आम्ही सरांसमोर जाऊन laptop सुरु केला.

... आणि एरवी "नाच बसंती" म्हणून बटन दाबल्याबरोबर आपले रंग दाखवणारा laptop चिडीचूप! missing operating system असा स्क्रीन वर संदेश!
हे प्रकरण आम्ही शक्य तितक्या थंडपणाने ट्रीट करत laptop ला चार्जिंग ला लावला. आणि याबद्दल शशांक ला कळवलं.
"बापरे! याआधी असलं काही नव्हतं झालं- " शशांक घाबऱ्या घुबऱ्या सांगत होता. 
"ठीक आहे" आम्ही अजून एक ट्राय मारतो. " मी एवढं म्हणून फोन  ठेवला. 
आणि धवलनं त्याचं फ़ेन्गशुइच लॉकेट कपाळाला लावून laptop चं  बटन दाबलं आणि "अहो आश्चर्यम !" laptop सुरु झाला. आनंदी आनंद झाला. तस्साच नेऊन laptop ला सरांपुढे नेऊन ठेवला. अन सरांनी त्यात करेक्शन सांगितलं !!!
शिवाय प्रिंट उद्याच काढा, मी परवा नाहीये हेही बजावलं. झालं. शेवटी पाच पर्यंत एडीट करून आठ वाजेपर्यंत कर्वेनगर ला जाऊन शीट प्लॉट केल्या. अन माझं जीवन धन्य झालं. 
या धांदलीत शशांकची bag माझ्या हातून सरांच्या केबिन मधेच राहिली अन मी हे साफ  विसरलो. थोड्यावेळानंतर   शशांक   विचारत विचारत  आला, तर माझी बत्ती गुल!
"आत्ता तर होती इथे?'- मी.
"झालं आता मिळाली bag !" - अभिषेक.
मला दोन मिनिटात घाम आला. मी तसाच केबिन मध्ये पळत गेलो, तर bag तिथे पडलेली, अन माझा जीवही- भांड्यात.
#  # # # #

     तर असले हे सबमिशन्स उरकता उरकता काय दिव्यातून जावं लागतं हे एक त्याला अन त्या इंजिनिअर जीवालाच माहीत. 
# # # # #

     स्ट्रेट बिवेल गेअर पेक्षा स्पायरल बिवेल गेअर कसा शांतपणे आवाज नं करता काम करतो व जास्त power transmit करतो हे वाचता वाचता मला तुषार चा call आला. एक प्रश्न किमान पाचवेळा विचारून समोरच्याचं उत्तर प्रत्येकवेळी सारखंच येत आहे का हे तपासून पाहणं हा याचा आवडता उद्योग. वकील असता  तर बरेच पैसे कमावले  असते. 
"काय करतोय " - तो. 
"अभ्यास"-मी
"ओके. किती झालं. "- तो.
"काही नाही बिवेल चालू केलंय, बघतोय"- मी. 
"कुठेस?" -तो
"लायब्ररीत " -मी
"का? लायब्ररीत का?" - तो
" अरे का म्हणजे काय तुषार? रूम वर झोप लागते म्हणून."
"पण काल तर म्हणत होतास की लायब्ररीत जाणार नाही म्हणून."
"हे बघ" मी म्हणालो "मी असलं काहीही म्हणालेलो नाहीये. आणि मी लायब्ररीतच आहे"
"ओके. काय करतोयेस आता? " तो
" सांगितलं ना बिवेल करतोय. "
" हो पण बिवेल मधलं काय?"
"थेरी " थेरी मधला "थ" जोरात उच्चारात मी म्हणालो.
"ओके थेरी भंडारी मधून कर थोडीच दिलीये आणि प्रॉब्लेम पण कमीच आहेत."
"ओके बाय"
"बाय"
# # # # #

     जसं बेवेल गेअर ची थेरी संपली तसा मी शेखर बरोबर टिफिन खायला आर्किटेक्चर कॉलेज समोर बसलो. 
"बघ ना पुष्कर" शेखर त्याचं frustration share करत होता."मला वाटतंय accenture मध्ये प्लेस  होऊन मी काहीच नाही अचिव्ह केलंय. तीन लाख annualy म्हणजे काहीच नाही. "
"अरे पण तू फ्रेशर आहेस. experience count होतो तुझा. पैसे काय उद्या पण मिळतील." - मी सांगत होतो.
बराच सांगितल्यावर त्याला "बरं" वाटलं.
"मोनी येतीये"-त्यानं सांगितलं.
"ह्या मोनीला 'येण्याशिवाय ' काय दुसरा उद्योग नसतो का? बघावं तेव्हा पुण्यातच पडीक. जरा मुंबईत राहावं. मुंबईची लाईफ एन्जॉय करावी"-मी सांगत होतो.
"अरे नाही ती Bharat petrolium मध्ये प्लेस झाली ना त्याची पार्टी देतीये. आठ लाख package आहे"- शेखर.
आता त्याच्या frustration चा सोर्स मला कळाला.

    एवढ्यात सोनल धापा टाकत आली. जेवायला बस म्हणेपर्यंत घास घेत म्हणाली, "एकतर एवढी कामं पडलीयेत पण आज्जी आजारी आहे असं सांगून बाहेर पडलीये. बँकेचं काम आहे, report सबमिट करायचाय, प्रोजेक्ट आहे -" एवढ्यात शेखर हात धुऊन आला अन दोघं कमिन्सला निघाले सुद्धा. अन मी रूम वर.

     रूम वर येऊन मी angels and demons रेझुम  केलं. 
     "......रॉबर्ट  लान्ग्डन आणि व्हीटोरीया चिगी chapel मध्ये येऊन पोचलेत. पण एका cardinal  च्या deadbody  शिवाय तिथे कहीही नाही. पूर्ण chapel मध्ये फक्त सूचक असे illuminati चे पिरामिड आहेत अन त्यात रॉबर्टला पुढचा क्लू शोधायचाय. अन galileo च्या  कवितेत पुढचा क्लू  आहे.
let angels guide you on your holy quest .
एन्जेल च्या मूर्तीने दाखवलेल्या बोटाच्या दिशेने तो पुढे निघालाय पण सूर्यप्रकाशात   झळाळून  उठलेल्या रोम शहरात त्याला कुठलाच क्लु दिसत नाही....."

     बास. खूप फिलोसोफिकॅल वाटायला लागलं म्हणून मी झोपी गेलो ते   थेट चार ला उठलो. खूप गाढ झोपल्यामुळे फ्रेश वाटलं.

     चहा घेतल्यावर अभ्यासासाठी नितांत गरजेची असलेली किक मिळाली अन मी परत गिअर्स  मध्ये बुडून गेलो 
# # # # #

No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...