अगदी कालपरवाची गोष्ट. तसा अगदी लहान प्रसंग, पण कायमचाच लक्षात राहून गेला. मी यावर्षी GATE ची तयारी करतोय. (PG ची entrance ) तर झालं असं की त्यासाठी च्या exam form वर Principal ची सही हवी होती . त्या सही शिक्क्यासाठी मी आणि तुषार त्यांच्या केबिन बाहेर थांबलो होतो. इतक्यात बेल वाजली. मी आपलं घाबरत घाबरत दार किलकिलं करून May I come in sir ? असं आज्ञाधारकपणे विचारलं. मानेनंच त्यांनी येण्यासाठी खुणावलं. मी आणि तुषार अगदी पावलांचाही आवाज न करता सावकाशपणे आत शिरलो. त्यांनी चष्मा वगैरे ठीकठाक केला आणि एकदा तो फॉर्म नीट वाचला. अन त्यावर भर्रकन सही केली. "हुश्श !" मी मनातल्या मनात म्हटलं. "झाली बुवा एकदाची सही" अशा अर्थाने मी तुषार कडे पाहिलं. कधी एकदा त्या tense वातावरणातून बाहेर पडतोय असं होऊन गेलं होतं. आता आम्ही मागे फिरणार तेवढ्यात त्यांनी वर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी खरंखुरं स्मितहास्य होतं. "All the best ! Do well in exam" असं अगदी प्रेमळपणे त्यांनी सांगितलं. त्याक्षणी जे काही वाटलं, ते शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे. कारण याआधी असं निदान faculty मधल्या कुणीच कधी wish केलं नव्हतं. आणि त्यातूनही Principal म्हणजे फार करडा वगैरे माणूस असं वाटलं होतं, आणि Principal generally तसे असतातही. पण या सरांचा खरंच मनापासून आदर करावा असं आतूनच वाटलं. (शाळेनंतर कित्येक वर्षांनी असं पहिल्यांदा वाटलं.)
म्हटलं तर प्रसंग अगदी छोटासाच पण कायमचा लक्षात राहून गेला. बात जो दिल को छू गयी म्हणतात तसा काहीसा.
# # # # #
तसा पीयूषाचा फोन म्हणजे ईद का चांद. म्हणजे मी तिला फार फोन वगैरे करतो अशातला भाग नाही, म्हणजे थोडक्यात करतच नाही. पण तीच बिचारी महिन्या-पंधरा दिवसातनं करत असते फोन. तर परवा तिचा फोन आला. सांगत होती की मुंबईत फार फिरणं वगैरे होत नाही, कारण room mates चं सोशिओ-इकॉनॉमिक background वेगळं पडतं वगैरे. त्यांची ट्रीप दिल्लीला चाललीये. थोडी थोडकी नाही तर तब्बल आठेक दिवस. म्हटलं मजा आहे. शेवटी Grant Medical. आणि ट्रीप पण AIIMS ला visit द्यायला चाललीये. मला AIIMS फक्त "तिथे पंतप्रधान admit होते " यामुळेच माहीत. असो. पण आठ वगैरे दिवसांचा stay शिवाय शिमला आणि आसपासची ठिकाणं पण ती बघून येणारे म्हणजे छानच.
बोलता बोलता academics चं विषय निघाला. त्यांचं एक अकॅडेमिक इयर दीड वर्षांचं असतं असं ती सांगत होती. शिवाय जसं जसं वरच्या वर्गात जाईल तसं तसं ही वर्ष चक्रवाढीने वाढत जातात. म्हणजे totally सातेक वर्ष! मला कधी कधी प्रश्न पडायचा की आपण medical ला गेलो असतो तर काय झालं असतं? काय झालं असतं त्याचं केस-स्टडी सकट उत्तर मिळालं.
म्हणजे ज्यांचं डॉक्टरकी हेच ध्येय आहे त्यांनी medical ला गेलंच पाहिजे पण ध्येय वेगळं असेल तर फक्त तिथलं glamour बघून जाण्यात काही point नाही.
# # # # #
Meanwhile अमृतानं excelsior चे फोटो धुवून आणलेत. सगळंच्या सगळं कलेक्शन तिनं मला पेनड्राइव मध्ये आणून दिलंय. त्यादिवशी सगळे फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खरंच ते दिवस सोन्याचे होते. मी कॉलेज च्या आर्ट कमिटी चा हेड होतो.आम्ही दिवसच्या दिवस मस्तमौला सारखं कॉलेज बंक करून आर्ट कमिटी ची कामे करीत असायचो. हे जमायचं . कारण आम्हाला आर्ट कमिटी च्या कामासाठी कॉलेज कडून officially bunksheet मिळायच्या. (नावडती भाजी पथ्यावर) आणि त्यातच तेव्हा cultural वीक असल्यामुळे रोज रात्री CC वर gathering असायचं. दिवसभराच्या कामाचा थकवा ट्रेजररने (हर्षल पह्राते) दिलेल्या कोल्ड कॉफी च्या पार्टी आणि त्या नाच गाण्यांच्या कार्यक्रमाने कुठल्या कुठे पळून जायचा. हे असंच कॉलेज रोज असावं असं वाटायचं. त्या दिवसांतल्या कित्येक संध्याकाळी कोल्ड कॉफी च्या स्वादाने गोड (किंवा कधीकधी roll house मधल्या chicken/veg रोल मुळे मसालेदार) झालेल्या आहेत. असो. नमनाला घडाभर घालण्याऐवजी ते तेल वाचवून मी थेट फोटोच अपलोड करतो. हे काही फोटो.
 |
excelsior चं वेलकम डिझाईन - क्रेडीट गोज टू तुषार !
त्याच्या बाजूला क्वोट्स लिहिलेले पोस्टर्स चिकटवलेले दिसतायेत
आणि मागच्या भिंतीच्या दगडाच्या pattern मुळे ते अजून उठून दिसतंय ( हे तुषार चं तीन तीनदा व्यक्त करून झालेलं मत.) |
 |
work in progress!!! |
 |
पायरेट्स मधली black pearl !!! (idea by Ekta, Priyanka and efforts by all)
फायनल सेट अप सुरु असताना |
 |
Well-finished Black Pearl.
शिप खरंच नजर खिळवून ठेवणारी बनली होती. Mechanical Department च्या सजावटीचं प्रमुख आकर्षण. |
 |
तुषार आणि शशांक
|
 |
कोल्ड कॉफी ची पार्टी
इन मंदार |
 |
शोएब
|
 |
I specially liked this scene |
 |
Sunday at work |
 |
Black पर्ल चं काम सुरु असताना |
 |
आम्ही केलेल्या सजावटीचा संपूर्ण view
मध्ये Triangle लटकलेला दिसतोय |
 |
Track चं एका रात्रीत केलेलं पेंटिंग |
 |
माउंटन rally चा track |
 |
Wall E - Cartoon Character |
 |
हाच तो
Phenomenal Triangle.
आयडिया चं पूर्ण क्रेडीट माझं. (सॉरी तुषार!) बाकी बनवताना सगळ्यांचीच फार हेल्प झाली Thanks to all !!
माझी आयडिया इतक्या छान पद्धतीने execute करण्यासाठी |
 |
a funny moment!!! |
हो .. आणि फोटो चं संपूर्ण क्रेडीट अमृतालाच !!!